Saturday, April 7, 2018

दक्षिणी मराठी यूट्यूब चॅनल


We just noticed this #FwdMsg is doing rounds in #WhatsApp. Our sincere thanks to whoever has composed this message. Thank you!

---

नमस्कार,

छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले १६७४ सालीं दक्षिण दिग्विजयाला गेले, तिकडचा अतिशय समृद्ध असा तंजावूर प्रांत त्यांनी जिंकून मराठ्यांच्या हिंदवी साम्राज्याला जोडला.

त्यांच्यासोबत महाराष्ट्रातून अठरापगड जातीजमातींची पाच लाख मराठी भाषक कुटुंबे १६व्या शतकातच तिकडे जाऊन स्थायिक झाली. हे सगळे आपण कुठे ना कुठे ऐकत असतो, वाचत असतो.

छत्रपतींचे भक्त म्हणून, मराठी भाषेचे प्रेमी म्हणून, किंवा इतिहासाभ्यासक म्हणून तिकडील मराठी भाषक बांधवांविषयी अधिक जाणून घेण्याची आपली फार इच्छा असते. 

परंतु त्यांच्याविषयी आपल्याला इकडे विशेष अशी काही माहिती मिळत नाही. आपल्याकडे तंजावरच्या महाराष्ट्रीय लोकांविषयी फारसे लिहिलेलेही आढळत नाही.

नाही म्हणायला तसे दोन-एक वर्षांपूर्वी एका न्यूज चॅनलने तंजावरच्या मराठी बोलणाऱ्या बांधवांवर एक डॉक्युमेंट्री केली होती. पण त्यातही त्यांना बोलू न देता हा पठ्ठ्या स्वतःच बडबड करत सुटला होता. त्यामुळे फारच मोठा भ्रमनिरास झाला होता.

पण आता आपल्या तंजावरच्या बांधवांविषयी जाणून घेण्याकरता इतर बाह्य स्त्रोतांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता उरलेली नाही. कारण तंजावरच्या महाराष्ट्रीय बांधवांनी स्वतःच आता यूट्युबवर 'दक्षिणी मराठी' या नावाने एक चॅनल सुरू केले आहे.

महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर राहूनही या आपल्या बांधवांनी आपली संस्कृती तिथे कशी जपली आहे?

तमिळबहुल अशा प्रांतात, त्यांच्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेला काय स्थान आहे?

महाराष्ट्राच्या मराठीत फारशी, अरबी आणि उर्दू शब्दांची रेलचेल असताना, अशुद्ध मराठी बोकाळत असताना, तंजावरच्या मराठीमध्ये काय परिस्थिती आहे? 

आजच्या दैनंदिन जीवनातही बोलताना त्यांच्याकडे सोळाव्या शतकातलेच शब्द कसे काय वापरले जातात? तिथे जाऊन त्यांची मराठी होती तशीच राहिली, की बदलूनच गेली?

काळानुरूप बदलत जाणाऱ्या परिस्थितीमध्ये नवीन शब्द निर्माण करण्याची आवश्यकता उत्पन्न झाल्यावर आपले तंजावूरचे बांधव संस्कृतोद्भव शब्दच वापरतात की तमिळोद्भव?

छत्रपतींच्या अनुयायांनी तंजावर प्रांती जाऊन तामिळ संस्कृती स्वीकारली, की मराठी संस्कृतीच तिथे वाढवली? तामिळनाडूच्या सांस्कृतिक क्रांतीमध्ये महाराष्ट्रीयांचे योगदान काय आहे?

सोळाव्या शतकात पाच लाख कुटुंबे स्थलांतरित झाली, त्यापैकी आज एकविसाव्या शतकात किती कुटुंबे तिथे आहेत? त्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अवस्था काय आहे?

या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या चॅनलवर पाहावयास मिळतील. कृपया खाली दिलेल्या लिंकवर एकदा क्लिक करा. चॅनलला सबस्क्राइब करा, आणि माहितीचा खजिनाच प्राप्त करा.

एक विनंती आहे. हा संदेश आवडला तर, जमेल तितक्या लोकांपर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, मराठी मनां-मनांत पोहोचवा!!

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

https://www.youtube.com/c/DakshiniMarathi

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴